कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यातील नावली पैकी धारवाडी इथं डोंगर खचल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या अंदाजे 45 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. डोंगराचा भाग खचत असल्याचे लक्षात येताच या सर्व कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.
कोल्हापुरात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. डोंगर खचल्यामुळे सर्वत्र भेगा पडल्या आहेत. पूरस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी ज्यांच्या घरी पुराचे पाणी शिरले होते त्यांनी स्थलांतर करावे, असे आवाहन केले आहे.
(हेही वाचा – Water Shortage : पुण्यासह ‘या’ १० जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई)
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. दुर्घटनेनंतर शोध कार्यात पावसासह इतर प्रचंड अडथळे आल्याने अखेर बचावकार्य थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बेपत्ता असलेल्यांच्या नातेवाईकांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community