Kolhapur Rain Alert: कोल्हापूरात पावसाचा हाहाकार! मुसळधार पावसामुळे २ राष्ट्रीय महामार्गांसह, ७ राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद

616
Monsoon Update: २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट: मुंबईत समुद्राला येणार भरती; जाणून घ्या पावसाचे काय आहेत अपडेट?
Monsoon Update: २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट: मुंबईत समुद्राला येणार भरती; जाणून घ्या पावसाचे काय आहेत अपडेट?

महाराष्ट्र राज्यातील विविध भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसांमुळे शेतकरी राजा सुखावला आहे. तर शहरासह खेड्यापाड्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे पंचगंगा नदीसह (Panchganga river) वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा ,घटप्रभा ,कासारी आदी नद्यांचे पाणी पात्र बाहेर पडल्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (Kolhapur Rain Alert)

तर पंचगंगेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून पंचगंगा सध्या ३७ फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण ७९ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा आपली इशारा पातळी गाठण्यासाठी अवघी दोन फूट शिल्लक आहे. तर शनिवारी दिवसभर शहरात पावसाची संतधार सुरू राहिल्याने पाणीपातळीत संत गतीने वाढ होत आहे.

(हेही वाचा – Kanwar Yatra Order : दुकानांवर मालकाचे नाव लिहिण्याच्या आदेशाचे Ramdev Baba यांच्याकडून समर्थन, म्हणाले…)

या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सज्ज असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी सांगितल आहे. दरम्यान काल शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी (Nrisimhwadi) येथे दत्त मंदिरात पाणी आल्याने गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच दक्षिणद्वार सोहळा पार पडला. (Kolhapur Rain Alert)

(हेही वाचा – Budget Session 2024: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक सुरू)

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

गेल्या 2 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता राजाराम बंधारा (Rajaram Dam) येथे पंचगंगेचे पाणी पातळी ३७ फूट इतकी आहे. पंचगंगाची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. यामुळे पंचगंगा इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक असून आपली वाटचाल इशारा पातळीच्या दिशेने सुरु केली आहे. दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पंचगंगा रविवारी संध्याकाळपर्यंत धोक्याची इशारा पातळी गाठेल असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. 

हेही पाहा – 

 

   

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.