राज्यासह जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक साखर कारखान्यांनी गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ केला. मंत्री समितीच्या बैठकीतही साखर कारखान्यांना १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची धुरांडी आजपासून पेटणार आहेत.
यावर्षी ९० ते ९५ दिवस कारखाने चालतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात गाळपासाठी १३५ लाख मेट्रिक टन आणि सांगली जिल्ह्यात ७८ लाख मेट्रिक टन, असा एकूण २१३ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. काही कारखानदारांनी ३,००१ रुपये, तर काही कारखानदारांनी ३,१०० रुपये एफआरपी देऊ, असे जाहीर केले आहे.
(हेही वाचा – Parenting Tips : पाल्याच्या समंजस भविष्यासाठी क्षमाशीलता शिकवण्याचे ७ मार्ग)
यावर्षी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे. याचा परिणाम उसाच्या वाढीवर झाला आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात ३० टक्के घट होणार आहे. त्याचा फटका साखर उत्पादन घटण्याावर होणार आहे. साखर उत्पादन घटल्यास याचा आर्थिक ताण (Financial stress) कारखान्यांवर येण्याची शक्यता आहे.
हेही पहा –