कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील हद्दवाढ कृती समितीने केएमटी बस सेवा रोखण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी सकाळी केएमटी वर्कशाॅपबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापूर हद्दवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा याआधीच कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीने दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळीच आंदोलन करत केएमटी वर्कशाॅपबाहेर निदर्शने करण्यात आली.
( हेही वाचा: चेंबूर,मानखुर्दमधील प्रकल्पबाधित इमारतींच्या सुरक्षेवर मासिक सव्वा कोटींचा खर्च : २०१५ पासून एकाच सुरक्षा कंपनीकडे रखवालदारी )
हद्दवाढीचा प्रश्न पेटला
कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न अधिक पेटण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत. कोल्हापूरमधील हद्दवाढीला विरोध करणा-या गावातील केएमटी सेवा बंद करा, असा इशारा हद्दवाढ कृती समितीने दिला होता. अन्यथा 12 सप्टेंबरला केएमटी वर्कशाॅपला टाळे ठोकणार, असेही कृती समितीने म्हटले होते. हद्दवाढ कृती समितीने महापालिकेला इशारा दिल्यानंतर, आता सोमवारी सकाळीच केएमटी बसच्या वर्कशाॅप बाहेर निदर्शने करण्यात आली. केवळ केएमटी बसच नव्हे तर लोकप्रतिनिधींचा पाणीपुरवठाही बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यांचा हद्दवाढीला विरोध आहे, त्यांचा पाणी पुरवठा बंद करा, असा इशारा देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community