कोल्हापूरातील दोन बंधारे पाण्याखाली

104

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 174.92 दलघमी पाणीसाठा आहे. शनिवारी सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार, राधानगरी धरणातून 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 174.92 दलघमी, तुळशी 78.49 दलघमी, वारणा 779.76 दलघमी, दूधगंगा 504.30 दलघमी, कासारी 59.44 दलघमी, कडवी 60.24 दलघमी, कुंभी 56.27 दलघमी, पाटगाव 84.14 दलघमी, चिकोत्रा 35.60 दलघमी, चित्री 49.63 दलघमी, घटप्रभा 36.40 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

( हेही वाचा: माजी मंत्र्यांना अजूनही सरकारी बंगल्यांचा मोह सोडवेना; भुजबळ,आव्हाडांसह अनेक नेते सरकारी बंगल्यातच )

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 13 फूट, सुर्वे 16.2 फूट, रुई 42.4 फूट, इचलकरंजी 39 फूट, तेरवाड 37.3 फूट, शिरोळ 27.9 फूट, नृसिंहवाडी 27.8 फूट, राजापूर 12.3 फूट तर नजीकच्या सांगली 8.6 फूट व अंकली 9 फूट अशी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.