कोळी महिलांनो, आपल्या परवान्यांचे करा नुतनीकरण, नाही तर रहाल ‘या’ योजनेपासून वंचित

108

राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदीसह थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्याने मासळी बाजारात कोळी भगिनींकडून वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलच्या बॉक्सऐवजी पर्यावरणपूरक कंटेनरचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या मंडईतील परवानाधारक मासे विक्रेत्यांना हे कंटेनर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील आतापर्यंत पात्र ठरलेल्या उर्वरीत पैकी १,७७१ मासळी विक्रेत्यांना या कंटेनरचा लाभ देण्यात येणार असून तीन कंटेनरचा हा सेट मिळवण्यासाठी कोळी भगिणींना आपल्या परवान्याचे नुतनीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे कोळी भगिनींनो आपल्या मासे विक्रीच्या परवान्याचे नुतनीकरण करा आणि तीन कंटेनरचा लाभ घ्या!

महापालिका बाजारातील  सुमारे ३,५००  परवानाधारक मासळी विक्रेत्या महिलांना मासे साठवणुकीकरता ५० लिटर, ६० लिटर आणि ७० लिटर अशाप्रकारे तीन पर्यावरणपूरक कंटेनरच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२१मध्ये निर्णय घेण्यात आला आणि डिसेंबर २०२१मध्ये महापालिकेच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात या वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून राबवलेल्या योजनेमध्ये परवानाधारक मासळी विक्रेत्या महिलांपैकी पर्यावरणपूरक कंटेनरच्या पुरवठ्यासाठी एकूण १,६१८ कोळी महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १,३८४ कोळी महिलांचे अर्ज हे कंटेनरकरता पात्र ठरले होते. परंतु आता या तीन कंटेनरच्या सेटसाठी उर्वरीत पैकी १,७७१ नोंदणीधारक महिला कोळी भगिनींना याचा लाभ देण्यासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे २ कोटी ४४ लाख रुपयांच्या प्रस्ताव तयार करण्यात आला असून प्रशासकांच्या मान्यतेनुसार याबाबतची पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

(हेही वाचा H3N2 Influenza : मास्क रिटर्न; नीती आयोगाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सन २०२०-२१ मध्ये ३,१६३ कोळी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. २०२१-२२मध्ये एकूण ९९१ पात्र कोळी महिलांना मासे साठवणुकीसाठी पर्यावरणपूरक मान्यताप्राप्त प्लास्टिक कंटेनर खरेदीकरता अर्थसहाय्य देण्यात आले. परंतु सन २०२१- २२मध्ये ३९३ लाभार्थ्यांना एक वेळच्या वापराचे कार्ड न मिळाल्याने सन  सन २०२२-२३च्या आर्थिक वर्षांत या खरेदीकरता नोव्हेंबर २०२२मध्ये मंजुरी प्राप्त झाली होती, उर्वरीत १,७७९ लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार ५०, ६० व ७० लीटर्सचे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) धोरणांतर्गत एकूण १३,५५५ रुपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २ कोटी ४१ लाख १४ हजार व एक वेळच्या वापराच्या कार्डचे शुल्क सेवाकर ३ लाख १४ असे मिळून २ कोटी ४४ लाख २९ हजार निधीची आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव प्रशासक स्थायी समितीला सादर केला असून या मान्यतेनंतर या कंटेनरचा लाभ डीबीटी अंतर्गत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी यापूर्वीची  एक अट काढून टाकण्यात आली असून ज्या अंतर्गत मुंबईच्या बाहेर राहणारे आणि मुंबईत व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला भगिनींना याचा लाभ मिळू शकतो. परंतु अनेक कोळी महिला या महापालिकेकडे नोंदणीकृत असल्याने  तरी त्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण न  झाल्याने ते या योजनेपासून वंचित राहत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोळी महिलांना आपल्या परवान्यांचे नुतनीकरण करावे, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो,असे आवाहन अधिकाऱ्यांनी केला आहे.

  • उर्वरीत पैकी मुंबईत १,७७९ परवानाधारक कोळी महिला
  • एका कोळी महिलेला मिळणार १३ हजार ५५५ रुपये किंमतीचे कंटेनर
  • ५० लीटर क्षमतेचा बॉक्स : २,९३० रुपये
  • ६० लीटर क्षमतेचा बॉक्स : ४,००१ रुपये
  • ७० लीटर क्षमतेचा बॉक्स  : ६,६२४ रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.