कोलकाता बलात्कार (Kolkata rape) हत्या प्रकरणाचा तपास करत असलेली सीबीआय रविवारी (25 ऑगस्ट) आरजी कार मेडिकल कॉलेजचे (RG Kar Medical College) माजी प्राचार्य संदीप घोष (Principal Sandeep Ghosh) यांच्या घरी पोहोचली. आर्थिक अनियमितता प्रकरणी सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने कोलकातामधील 15 ठिकाणी घोष यांच्या घरासह झडती घेतली आहे. (Kolkata Dr Rape Case)
आर्थिक अनियमितता प्रकरणी सीबीआयने (CBI Investigation Kolkata Dr Rape Case) शनिवारी (24 ऑगस्ट) संदीप घोष यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. घोष यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांच्या कार्यकाळात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगाल सरकारने आर्थिक अनियमिततेचा तपास एसआयटीकडे (SIT) सोपवला होता. मात्र, कलकत्ता उच्च न्यायालयाच्या (Calcutta High Court) आदेशानुसार एसआयटीने तपास सीबीआयकडे सोपवला आहे.
(हेही वाचा – जातीनिहाय जन गणनेवरून Prashant Kishor यांनी राहुल गांधींना सुनावले; म्हणाले….)
दुसरीकडे, बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याची आज पॉलीग्राफ चाचणी होऊ शकते. शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सहा आरोपींची पॉलीग्राफी चाचणी घेण्यात आली. मुख्य आरोपी संजय रॉय याची तुरुंगात चौकशी करण्यात आली, तर माजी प्राचार्य संदीप घोष, 4 सहकारी डॉक्टर, 1 स्वयंसेवक यांची सीबीआय कार्यालयात चौकशी करण्यात आली. पॉलिग्राफी चाचणी दिल्लीच्या सेंट्रल फॉरेन्सिक टीमने केली. (Kolkata Dr Rape Case)
9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. सकाळी त्याचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. यानंतर देशभरात डॉक्टरांनी आंदोलन केले. कोलकात्यातील डॉक्टर आज सलग 16 व्या दिवशी संपावर आहेत. उर्वरित संघटनांनी संप मागे घेतला आहे.
(हेही वाचा – Rahul Gandhi यांनी आता सौंदर्य स्पर्धेतही आणली जात्यंधता; भाजपाने चांगलेच सुनावले )
सीबीआय टीमची निवासी डॉक्टरांनी घेतली भेट
निवासी डॉक्टरांच्या पथकाने शुक्रवारी (24 ऑगस्ट) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. शनिवारी एका डॉक्टरने सांगितले की सीबीआयच्या तपासावर आणि त्याच्या उत्तरांवर ते समाधानी नाहीत. ते म्हणाले की, आम्ही सर्व आरोपींना शोधण्यासाठी मुदत मागितली होती, मात्र ते शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तेथूनही आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. न्याय हीच आमची मागणी आहे. न्यायालयाने सीबीआयला 17 सप्टेंबरपर्यंत बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community