Kolkata Murder Case : आरोपीची पॉलीग्राफ टेस्ट करण्यास न्यायालयाची सीबीआयला परवानगी

153
Kolkata Murder Case : आरोपीची पॉलीग्राफ टेस्ट करण्यास न्यायालयाची सीबीआयला परवानगी
Kolkata Murder Case : आरोपीची पॉलीग्राफ टेस्ट करण्यास न्यायालयाची सीबीआयला परवानगी

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट (polygraph test) करण्यासाठी कोलकाता न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली दिली आहे.

(हेही वाचा – Badlapur च्या शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, ४ दिवसांनंतर शाळेचा माफीनामा)

आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेचा विविध पद्धतीने तपास सुरू आहे. संजय रॉय या व्यक्तीवर हत्येचे आरोप लावण्यात आले असून त्याची पॉलीग्राफ टेस्ट करण्यासाठी कोलकाता न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे. (Kolkata Murder Case)

९ ऑगस्ट रोजी कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने देशभरात एकच खळबळ उडाली. १३ ऑगस्ट रोजी देशभरातील डॉक्टरांनी बंद पुकारला होता. पीडित तरुणीचा शावविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून त्यात तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तिचा गळा दाबल्यामुळे थायरॉईड कास्थी तुटली होती. तसेच आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

तपास कोलकाता पोलिसांकडून सीबीआयकडे

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी तातडीने अटक केली होती. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याआधी आरोपी संजय रॉय याची मानसिक चाचणी करण्यात आली होती. त्याची मानसिक स्थिती कशी आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशातच आता कोलकाता न्यायालयाने सीबीआयला आरोपीची पॉलीग्राफ टेस्ट करण्यासाठी परवानगी दिली आहे. एखादी व्यक्ती किती खरं आणि किती खोटं बोलतेय याची चाचपणी करण्यासाठी पॉलीग्राफ टेस्ट केला जाते. (Kolkata Murder Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.