गणपतीसाठी कोकण प्रशासन सज्ज! महामार्गावर मदतीसाठी २१ वैद्यकीय मदत केंद्रे

173

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यातून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होतात, यासाठी कोकण प्रशासनाने विशेष व्यवस्थापन केले आहे. मुंबई- गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपत्तीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. एकूण २१ ठिकाणी ही आरोग्य तपासणी केंद्रे असणार आहेत.

( हेही वाचा : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर तात्पुरती टोलमाफी )

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात येण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होते. या वेळी अपघात होऊन जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता असते. यात तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

या २१ ठिकाणी आरोग्य केंद्रे

खेड – हॉटेल अनुसयाजवळ हॅप्पी धाब्याजवळ, भरणे नाका भोस्ते घाट, चिपळूण – सवतसडा, कळंबस्ते फाटा, बहादूरशेख नाका, खेर्डी नाका, कापसाळ, अलोरे, सावर्डे, संगमेश्वर, आरवली, तुरळ, गोळवली, देवरूख फाटा, मुर्शी, रत्नागिरी – हातखंबा तिठा, पाली, लांजा – वेरळ, कुवे गणपती मंदिर, राजापूर बसस्थानक.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.