Ganeshotsav Special ST : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणार ? एसटीचे नियोजन जाणून घ्या…

११ स्थानकांसह ३५ तात्पुरत्या थांब्यांवरून जादा एसटी रवाना होणार

220
Ganeshotsav Special ST : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणार ? एसटीचे नियोजन जाणून घ्या...
Ganeshotsav Special ST : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणार ? एसटीचे नियोजन जाणून घ्या...

यंदा गणेशचतुर्थी १९ सप्टेंबरला आहे. सोमवारी हरितालिका आहे. रविवार सुट्टी असल्याने त्यापूर्वी म्हणजेच शनिवारी अर्थात १६ सप्टेंबरला विशेष गाड्या (Ganeshotsav Special ST) चालवण्याची प्रवाशांची मागणी आहे. यामुळे १६ सप्टेंबरला मुंबईतून १ हजार ४०० जादा एसटी कोकणासाठी रवाना करण्यात येणार आहेत. ११ स्थानकांसह ३५ तात्पुरत्या थांब्यांवरून जादा एसटी रवाना होणार आहेत. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वेसोबत एसटी बसचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी २६ दिवस उरले आहेत. उत्सवाच्या दिवसांत भाविक-प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गाड्यांसाठी मुख्य स्थानकांसह तात्पुरत्या स्थानकांतून गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. विशेष एसटी गाड्यांना वैयक्तिक आणि सांघिक आरक्षणाची मुभा आहे. यामुळे स्थानकांतील गर्दी कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्थानकांतूनच गाड्या (Ganeshotsav Special ST) रवाना करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.

(हेही वाचा – Jio Recharge Plan : रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद, आता खर्च करावे लागणार ‘इतके’ रुपये)

१,२७२ गाड्यांचे सांघिक आरक्षण

मुंबई विभागातून ५३५, ठाणे विभागातून २८८ आणि पालघर विभागातून ४४९ अशा एकूण एक हजार २७२ जादा गाड्यांचे सांघिक आरक्षण पूर्ण झाले आहे. उत्सवकाळासाठी एकूण 2 हजार १४७ गाड्यांचे आरक्षण २३ ऑगस्टअखेर पूर्ण झाले आहे.

आरक्षणसाठी संपर्क

प्रवाशांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे उत्सवकाळातील गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी जवळच्या एसटी स्थानकात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Ganeshotsav Special ST)

मुंबई सेंट्रल : २३०७४२७२ – तात्पुरते थांबे : साईबाबा, काळाचौकी, गिरगाव, कफ परेड, काळबादेवी, महालक्ष्मी

परळ : २४२२९९०५ – तात्पुरते थांबे : सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य सभागृह, जोगेश्वरी

कुर्ला नेहरूनगर : २५२२२०७२ – तात्पुरते थांबे बर्वेनगर/ सर्वोदय रुग्णालय, टागोरनगर (विक्रोळी), घाटला (चेंबूर), डी. एन. नगर (अंधेरी), गुंदवली (अंधेरी), सांताक्रूझ (आनंदनगर/शास्त्रीनगर), विलेपार्ले, खेरनगर (वांद्रे), शीव

ठाणे – २५३३२३६१ – तात्पुरते थांबे : भाईंदर, लोकमान्यनगर (ठाणे), श्रीनगर (कळवा-विटावा), नॅन्सी कॉलनी (बोरीवली), मालाड, डहाणूकरवाडी/चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्पसिद्धी गणेश मंदिर (गोरेगाव), भांडुप (पश्चिम) व (पूर्व), मुलुंड (पूर्व)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.