कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांच्या कामांना गती देणार – Girish Mahajan

51
कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांच्या कामांना गती देणार - Girish Mahajan
  • प्रतिनिधी

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून ज्याठिकाणी अडचणी आल्यास तेथे सममन्वयाने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. मंत्रालयीन दालनात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची विषयी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – Mumbai Goa Highway: जानेवारीच्या ‘या’ तारखेपासून पूर्ण क्षमतेने चालू होणार कशेडी बोगदा)

मंत्री महाजन (Girish Mahajan) यांनी म्हणाले, अपूर्ण प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. सुरु असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यात यावी. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मंत्री महाजन (Girish Mahajan) यांनी महामंडळाच्या भविष्यकालीन प्रकल्पांचाही सविस्तर आढावा यावेळी घेतला.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘इतक्या’ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन)

यावेळी सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय बेलसरे, कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, सहसचिव तथा मुख्य अभियंता अभय पाठक, संजिव टाटू, प्रसाद नार्वेकर, मिलिंद नाईक, प्रसाद नार्वेकर यांच्यासह महामंडळचे व विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे सर्व प्रकल्पाविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. (Girish Mahajan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.