कोकणातील करूळ घाटात संरक्षक भिंत कोसळली; वाहतूक ठप्प

163

गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत असून वैभववाडीत २४ तासात १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका तळकोकणाला बसला असून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वपूर्ण करूळ घाटातील संरक्षित भिंत कोसळून रस्ता खचला आहे. कोणचाही अनुचित प्रकार घडू नये याकरता या मार्गाने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गाची वाहतूक फोंडाघाट आणि आंबोली मार्गे वळविण्यात आली आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ बसने प्रवास करताना बुक करा तुमची जागा; लवकरच सुरू होणार आरक्षण सुविधा! )

संरक्षक भिंत कोसळली

मागील २४ तासांमध्ये वैभववाडीत १२७ मिमी पाऊस पडला. या पावसाचा फटका तळकोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या करूळ घाटाला बसला आहे. रात्री दहाच्या सुमारास घाटातील संरक्षक भिंत कोसळून करूळातील संपूर्ण रस्ता खचला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गाने जाणारी वाहतूक फोंडाघाट आणि आंबोली मार्गे वळवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरला हवामान खात्याने ५ दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे मच्छिमारांनासुद्धा हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.