नववर्षाचे स्वागत आणि लागोपाठ सुट्ट्यांमुळे बरेच नागरिक कोकण, गोवा अशा पर्यटनस्थळांना भेटी देतात. यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन आरक्षण मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर आता कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वेमार्गावर एलटीटी ते मंगलुरू आणि मडगावसाठी दोन विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : व्हॉट्सअॅपवर एका क्लिकवर मिळणार LIC च्या सुविधा! कसे कराल रजिस्ट्रेशन? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)
मुंबई – मंगळूरु साप्ताहिक स्पेशल (10)
- 01453 ही विशेष गाडी दिनांक ९ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी २०२३ (५ सेवा) दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १७.०५ वाजता पोहोचेल.
- 01454 ही विशेष गाडी दिनांक १० डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ (५ सेवा) मंगळूर जंक्शन येथून दर शनिवारी १८.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १४.२५ वाजता पोहोचेल.
- थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकींबिका रोड बैन्दूर कुंदापुरा, उडुपी आणि सुरथकल.
- संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये दोन गार्ड ब्रेक व्हॅन डब्बे.
- एलटीटी ते मंगलुरू ही गाडी क्र. 01453 येत्या ९ डिसेंबरपासून ६ जानेवारीपर्यंत दर शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मंगलुरू ते एलटीटी ही गाडी क्र. 01454 मंगलुरू येथून येत्या १० डिसेंबरपासून ७ जानेवारीपर्यंत दर शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता पोहोचेल. या गाडीला १७ डबे असतील.
मुंबई – मडगाव साप्ताहिक विशेष (2)
- 01455 ही विशेष गाडी दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
- 01456 ही विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोजी ११.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
- थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
- संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन आहेत.
- एलटीटी ते मडगाव या गाडीची एकच फेरी होणार आहे. गाडी क्र. 01455 एलटीटी ते मडगाव या मार्गावर १ जानेवारी रोजी रात्री सव्वादहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01456 मडगावहून २ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुटेल आणि रात्री पावणेबारा वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीलाही १७ डबे असतील.