मुंबई-मडगाव वातानुकूलित डबल डेकर एक्सप्रेस गाड्यांचे विलीनीकरण; 1 नोव्हेंबरपासून होणार बदल

लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेस (द्वि-साप्ताहिक) आणि 11099/11100 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेस (साप्ताहिक) या गाड्या विलीन करण्यात येणार आहेत. या विलीन झालेल्या ट्रेनची सुधारित संरचना, वारंवारता, वेळ खालीलप्रमाणे असेल…

( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा)

ट्रेनची नवी संरचना

  • 11099 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 4 नोव्हेंबर 2022 पासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी 00.45 वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी 11.30 वाजता पोहोचेल.
  • 11100 ही गाडी दिनांक 4 नोव्हेंबर 2022 पासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी 12.45 वाजता मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी 23.45 वाजता पोहोचेल.

सुधारित संरचना : एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, 8 तृतीय वातानुकूलित, 6 शयनयान क्लास, एक ब्रेक व्हॅनसह 4 सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक पॅंट्री कार.

  • ट्रेन क्र.11085/86 LTT-मडगाव एसी डबल डेकर एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) विलीनीकरणानंतर उपलब्ध राहणार नाही.
  • 11086 मडगाव वातानुकूलित डबल डेकर एक्सप्रेस दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी मान्सूनच्या वेळेनुसार धावेल.

प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवास सुरू करण्यापूर्वी वरील गाड्या थांबणाऱ्या स्थानकांवरील तपशीलवार वेळेसाठी NTES ॲप डाउनलोड करावे. असे आवाहन रेल्वेने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here