गणेशोत्सवाला अनेक चाकरमानी मुंबई-पुण्यातून कोकणात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर मुंबई – मडगाव एसी डबल डेकर एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने एसी डबल डेकर एक्स्प्रेसला अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित आणि वातानुकूलित चेअर कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : आता २०० ‘बेस्ट’ बसमध्ये प्रवाशांना मिळणार ‘टॅप इन टॅप आउट’ सुविधा)
गाडीची संरचना
- दोन द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित आणि १ वातानुकूलित चेअर कोच.
- ट्रेन क्रमांक 11099/11100 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एसी डबल डेकर साप्ताहिक एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक २७ ऑगस्ट २०२२ ते १० सप्टेंबर २०२२ पर्यंत आणि मडगाव येथून दिनांक २८ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत अतिरिक्त डबे जोडण्यात येतील.
- ट्रेन क्रमांक 11085/11086 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एसी डबल डेकर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक २९ऑगस्ट २०२२ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत आणि मडगाव येथून दिनांक ३० ऑगस्ट २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत अतिरिक्त डबे जोडण्यात येतील.
ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशांना त्यांच्या तिकिटांची पीएनआर स्थिती तपासावी अशी विनंती मध्य रेल्वेने केली आहे.
Join Our WhatsApp Community