उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की, मुंबईतील चाकरमानी वर्ग सहकुटुंबासह कोकणची वाट धरतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.
( हेही वाचा : आता मिळवा मोफत आरोग्य सेवा! कशी ते वाचा… )
उन्हाळी विशेष गाड्या
- गाडी क्रमांक 01045 ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ७, ९, ११, १३, १५, १७ आणि १९ एप्रिल रोजी (७ फेऱ्या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01046 ही विशेष गाडी थिविम येथून दिनांक ८, १०, १२, १४, १६, १८ आणि २० एप्रिल रोजी (७ फेऱ्या) थिविम येथून दुपारी ०२.१० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड
संरचना : एक प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
आरक्षण सुविधा
या गाड्यांची बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
Join Our WhatsApp Community