कोकण रेल्वेने प्रवास करताय?; ३१ मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ट्रेनच्या फेऱ्या रद्द!

147

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरी ते मडगाव जंक्शनदरम्यान कोकण रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेय त्यामुळे या मार्गावरील रत्नागिरी-मडगाव गाडी तात्पुरत्या स्वरूपात ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूंच्या फेऱ्या ३१ मार्च २०२३ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना होणार निवड, ६५ हजारापर्यंत मिळेल पगार)

३१ मार्च २०२३ पर्यंत फेऱ्या रद्द 

या गाड्यांच्या फेऱ्या आधी ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या परंतु आता दुरुस्तीचे काम लांबणार असल्यामुळे ३१ मार्चपर्यंत या गाडीच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुढे रत्नागिरी इथे तासाभराच्या थांब्याने रत्नागिरी मडगाव म्हणून चालविण्यात येत होती ही गाडी आता रद्द करण्यात आली आहे.

नववर्षासाठी विशेष गाड्या 

नववर्षाचे स्वागत आणि लागोपाठ सुट्ट्यांमुळे बरेच नागरिक कोकण, गोवा अशा पर्यटनस्थळांना भेटी देतात. यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन आरक्षण मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर आता कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वेमार्गावर एलटीटी ते मंगलुरू आणि मडगावसाठी दोन विशेष साप्ताहिक गाड्या अशा एकूण १० अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.