कोकण रेल्वेमध्ये नोकरी (Konkan Railway Recruitment) करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. तुम्हालाही जर रेल्वेत करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती सुरू असून आता अर्जासाठी आठवड्याहूनही कमी वेळ उरला आहे. कोकण रेल्वेच्या 11 पदांसाठी सध्या अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
‘या’ पदांसाठी भरती
दहावी उत्तीर्ण ते कोणत्याही शाखेतील तसेच इंजिनिअरिंगची पदवी असणारी पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले असून कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज 16 सप्टेंबरपासून करता येणार आहे. सीनियर सिव्हिल इंजिनिअरसह टेक्निशियन, सुपरवायझर अशा एकूण 190 जागांसाठी कोकण रेल्वे भरती करणार आहे. यातील एकूण 6 पदांसाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असून दोन इंजिनिअरिंग पदवीची पद सोडता 3 पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे. (Konkan Railway Recruitment)
‘या’ वयोगटासाठी आहे भरती?
18 ते 36 वर्ष असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. एससी, एसटीतील इच्छुक उमेदवारांना यात पाच वर्ष सूट देण्यात आली असून ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष सूट आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार असाल तर यासाठी 59 रुपये अर्ज शुल्क असून अधिकृत संकेतस्थळावर यातील पदांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यासाठी नोटिफिकेशन निघाला असून अधिकृत संकेतस्थळावर 16 सप्टेंबर पासून अर्ज खुले होणार आहेत. हे अर्ज सहा ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहतील. (Konkan Railway Recruitment)
पगार किती?
लेवल १च्या पदांसाठी १८००० रुपये, लेवल २ च्या पदांसाठी १९९०० रुपये तर लेवल ५ ते लेवल ७ च्या पदांसाठी ३५,४०० ते ४४९०० रुपयांदरम्यान पगार देण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेनं सांगितलं आहे. (Konkan Railway Recruitment)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community