कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना होणार निवड, ६५ हजारापर्यंत मिळेल पगार

147

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लेखा व्यवस्थापक पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरता हजर रहावे असे कोकण रेल्वेने सांगितले आहे. मुलाखतीची तारीख ११ जानेवारी २०२३ आहे.

( हेही वाचा : १५ डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावर धावणार ‘लालपरी’! ‘या’ नागरिकांना मिळणार ५० टक्के सवलत; जाणून तिकीट दर… )

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – कनिष्ठ लेखा व्यवस्थापक
  • पदसंख्या – ४ जागा
  • वयोमर्यादा – ३५ वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीकरता हजर रहावे.

     

  • उमेदवारांना मुलाखतीसाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

     

  • नोंदणीची वेळ सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत आहे.
  • मुलाखतीची तारीख – ११ जानेवारी २०२३
  • अधिकृत वेबासाईट – kokanrailway.com

मुलाखतीचा पत्ता : 

एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर ४० सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई

वेतनश्रेणी

मुलाखतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ६५ हजार ६८८ एवढा पगार प्रतिमहिना दिला जाणार आहे.

New Project 6 4

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.