कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहायक प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहायक, कनिष्ठ तांत्रिक सहायक पदांच्या ४१ रिक्त जागा भरण्यासाछी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरता हजर रहावे. मुलाखतीच्या तारखा पदांनुसार १९, २०, २३, २४ व ३० जानेवारी २०२३ या आहे.
( हेही वाचा : दहिसर आणि मुलुंडच्या जकात नाक्यांची काही जागा एमएसआरडीसीला)
अटी व नियम जाणून घ्या…
- पदाचे नाव – सहायक प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहायक, कनिष्ठ तांत्रिक सहायक
- पदसंख्या – ४१ जागा
- वयोमर्यादा
- सहायक प्रकल्प अभियंता – ४५ वर्ष ( ३ पदे )
प्रकल्प अभियंता – ४५ वर्ष ( ३ पदे )
वरिष्ठ तांत्रिक सहायक – ३५ वर्ष ( २५ पदे )
कनिष्ठ तांत्रिक सहायक – ३० वर्ष ( १० पदे ) - निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता –
एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार येथे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडजवळ सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४०, सीवूड्स ( पश्चिम), नवी मुंबई
मुलाखतीची तारीख – १९, २०, २३, २४ आणि ३० जानेवारी २०२३ (पदांनुसार)
सहायक प्रकल्प अभियंता – १९ जानेवारी २०२३
प्रकल्प अभियंता – २० जानेवारी २०२३
वरिष्ठ तांत्रिक सहायक – २३ जानेवारी २०२३
वरिष्ठ तांत्रिक सहायक ( खुर्दा रोड – बोलांगीर ) – २४ जानेवारी २०२३
कनिष्ठ तांत्रिक सहायक – ३० जानेवारी २०२३
- अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com
वेतनश्रेणी
- सहायक प्रकल्प अभियंता – ७७ हजार ४१८ रुपये महिना
- प्रकल्प अभियंता – ७७ हजार ४१८ रुपये महिना
- वरिष्ठ तांत्रिक सहायक – ६१ हजार ९६१ रुपये महिना
- कनिष्ठ तांत्रिक सहायक – ४८ हजार ८५२ रुपये महिना
- वरील भरतीकरता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- नोंदणी ९.०० ते १२.०० या वेळेत पूर्ण करणे.
- फक्त पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.