कोकण रेल्वेची ‘तेजस एक्स्प्रेस’ १५ सप्टेंबरपासून विस्टाडोम कोचसह मडगावपर्यंत धावणार

कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या मार्गावर धावणाऱ्या आणखी एका रेल्वे गाडीला विस्टाडोम जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यापर्यंत धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला येत्या १५ सप्टेंबरपासून विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे.

( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा)

तेजस एक्स्प्रेस विस्टाडोमसह धावणार 

सध्या मुंबईतील सीएसएमटी ते गोव्यातील करमाळीदरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस (क्र. 22119/22120) १ नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत धावणार आहे. त्याआधी १५ सप्टेंबरपासून या वातानुकूलित आलिशान एक्स्प्रेस गाडीला सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. यामुळे आता ही गाडी एकूण पंधरा एलएचबी कोचसह धावणार आहे.

मुंबईहून गोव्याला येणाऱ्या प्रवाशांकडून तसेच पर्यटकांकडून आधीपासूनच जनशताब्दी एक्स्प्रेसला असलेल्या विस्टाडोम कोचला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेत रेल्वेने याच मार्गावरील तेजस एक्स्प्रेसलादेखील पारदर्शक काचांचा अत्याधुनिक विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये

अनोखे विस्टाडोम डबे, काचेचे छत, रुंद खिडकीचे पॅनल, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, रुंद स्लाइडिंग दरवाजे इ. अशी अनेक असामान्य वैशिष्ट्ये यात आहेत. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण व्ह्यूइंग गॅलरी सुद्धा यामध्ये आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here