कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुंबईकडे येणा-या प्रवाशांचे हाल, ‘या’ गाड्या उशिराने

151

कोकण रेल्वेची वाहतूक गुरुवार मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली आहे. दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान मडगाव- मुंबई कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला होता. त्यामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवर खोळंबल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांसह कोकण दौ-यावर निघालेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना बसला होता.

कोकणकन्या अखेर मार्गस्थ

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मडगाव- मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळबंल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणा-या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

( हेही वाचा: रणजित सावरकरांसमोर सावरकरविरोधक हतबल! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.