पावसाळा संपला! १ नोव्हेंबरपासून कोकणातील सर्व गाड्या धावणार नव्या वेळेत; पहा वेळापत्रक

214

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळते तसेच या अपघात टाळण्यासाठी दरवर्षी कोकणातील गाड्यांच्या वेगावर जून ते ऑक्टोबर दरम्यान मर्यादा घालण्यात येतात. हे पावसाळी वेळापत्रक ३० ऑक्टोबरला समाप्त होऊन १ नोव्हेंबरपासून गाड्या नव्या वेळपत्रकानुसार धावणार आहे. पावसाळ्यात गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १ ते २ तास आधी निघतात. आता मात्र पावसाळा संपल्यावर गाड्यांच्या वेळा पुन्हा बदलण्यात आल्या आहेत. सर्व चाकरमान्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वेकडून केले जात आहे.

( हेही वाचा : परीक्षेविना थेट नोकरीची संधी! भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत ‘या’ तारखेला होणार मुलाखती)

कोकण रेल्वेचे पावसाठी वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार असून आता नव्या वेळापत्रकानुसार खालीलवेळेत गाड्या धावतील…

असे असेल नवे वेळापत्रक…

जनशताब्दी एक्स्प्रेस

  • मुंबईवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावरून जनशताब्दी पहाटे ५.१० सुटेल, रत्नागिरी १०.२५, कणकवलीला ११.५० ला थांबा घेत पुढे मडगावला दुपारी १४.१० ला पोहोचेल.
  • परतीच्या प्रवासासाठी जनशताब्दी मडगाववरून दुपारी १४.४० ला सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे रात्री २३.३० ला पोहोचेल.

कोकणकन्या एक्स्प्रेस

  • मुंबईहून मडगावला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री २३.०५ ला सुटेल आणि मडगावला १०.४५ ला पोहोचेल.
  • मडगाववरून मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पहाटे ५.४० ला पोहोचेल.

मांडवी एक्स्प्रेस

  • मुंबईहून मडगावला जाणारी मांडवी गाडी सकाळी ७.१० ला सुटेल.
  • मडगाववरून परतीच्या प्रवासासाठी मांडवी सकाळी ९.१५ ला सुटेल आणि रात्री २१.४५ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

तुतारी एक्स्प्रेस

  • दादर- सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस रात्री १२.०५ ला दादरवरून सुटेल आणि सकाळी १०.४० ला सावंतवाडीला पोहोचेल.
  • परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडीवरून तुतारी एक्स्प्रेस सायंकाळी १९.१० ला सुटेल आणि सकाळी ६.४० दादर मुंबई येथे पोहोचेल.

दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेस

  • दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस सकाळी ६.२६ ला दिव्यावरून सुटेल आणि सावंतवाडीला सायंकाळी १८.१५ ला पोहोचेल.
  • सावंतवाडीहून दिव्याकडे जाणारी दिवा पॅसेंजर गाडी सावंतवाडी येथून सकाळी ८.४० ला सुटून दिव्याला रात्री २०.१० ला पोहोचेल.

कोकण रेल्वेमार्गांवर दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे यावर उपाय म्हणून या मार्गावर कोकण रेल्वेचा वेग मंदावण्यात येत असतो. परंतु आता पाऊस संपल्यावर १ नोव्हेंबरपासून पुन्हा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शिवाय कोकणकन्या एक्स्प्रेस १ जानेवारी २०२३ पासून सुपरफास्ट होणार असून नव्या वेळेत धावणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.