कोकण रेल्वे करणार ‘एवढ्या’ कोटींची बचत, होईल सुपरफास्ट प्रवास! जाणून घ्या विद्युतीकरणाचा फायदा

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यावर आता बऱ्याच गाड्या विजेवर धावत आहेत. आता तेजस एक्स्प्रेस सुद्धा विद्युत इंजिनावर धावणार आहे. मालगाड्यांपाठोपाठ काही महत्त्वाच्या गाड्या इलेक्ट्रिक इंजिनावर धावत होत्या. आता प्रवाशांचा प्रवास सुकर आणि प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी २५ नोव्हेंबरपासून तेजस एक्स्प्रेस विजेवर धावणार आहे. डिझेलमुळे होणारा खर्च, इंजिनातून निघणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या वर्षांपासून रेल्वे मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न केले जात होते. विद्युतीकरणामुळे कोकणवासीयांचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि वेगवान होईलच तसेच कोकणचे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा अबाधित राहण्यास मदत होईल.

( हेही वाचा : कोकणातील चाकरमान्यांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावर दररोज धावणार मेमू ट्रेन)

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात देशात पहिली तेजस एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गावर मुंबई सीएसएमटी ते करमाळी दरम्यान धावली.

या गाड्या विजेवर धावणार

  • (२२११५/२२११६) लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी विकली एक्स्प्रेस ( २४ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार)
  • (२२११९/२२१२०) मुंबई सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस ( २५ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार)
  • (२२११३/२२११४) लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली ( २६ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार)

विद्युतीकरणाचा फायदा

मुंबई ते कोकण या मार्गावर जवळपास २० रेल्वेगाड्या धावतात. विद्युतीकरणामुळे कोकणाचे सौंदर्य अबाधित राहून प्रदूषण कमी होईलच शिवाय सर्व रेल्वेगाड्या विजेवर सुरू केल्यानंतर तब्बल १५० कोटींची बचत करणे शक्य होणार आहे असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांचा वेगही विद्युतीकरणामुळे वाढणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here