शिमगोत्सवासाठी ‘या’ तारखेपासून धावणार Konkan Railway ची दादर-रत्नागिरी विशेष गाडी

110
शिमगोत्सवासाठी 'या' तारखेपासून धावणार Konkan Railway ची दादर-रत्नागिरी विशेष गाडी

मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी मार्गावर होळीसाठी दि. ११ मार्च २०२५ पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित धावणार आहे. (Konkan Railway)

(हेही वाचा – Narveer Tanaji Malusare समाधी परिसर सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर)

गाडी क्र. ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल. परतीची गाडी क्र. ०११३२ रत्नागिरी दादर गाडी १२, १४ आणि १७ मार्च २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल. (Konkan Railway)

(हेही वाचा – Ladki Bahin योजनेतील १,५०० चे २,१०० रुपये अनुदान वाढ लांबणीवर?)

गाडीला एकूण १६ डबे असतील. त्यातील सर्वसाधारण श्रेणीचे १४, तर एसएलआर २ डबे असतील. ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल. (Konkan Railway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.