कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) (‘केएमबीएल’/‘कोटक’) आपल्या ‘सेहत का सफर’ या प्रभावी सीएसआर उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा करत आहे. भारतातील व्यावसायिक वाहन चालकांमध्ये आरोग्य व स्वास्थ्य यांविषयी जागरूकता निर्माण करण्याप्रती हा उपक्रम समर्पित आहे. मागील पर्वात ३० ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची व्याप्ती यंदा वाढवण्यात आली असून, ४५ ठिकाणी तो आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे ४,००० ट्रकचालकांना मोफत आरोग्यतपासणी शिबिरांद्वारे लाभ मिळण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Dadar Railway स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, मला…)
दुलियाजान, दुर्गापूर, पटना, दिल्ली, कोइंबतूर, भोपाळ आणि अशा अनेक उच्च घनतेच्या वाहतूक केंद्रांच्या परिसरात ही शिबिरे घेतली जाणार आहेत. राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या वाहनचालकांचे राहणीमान उंचावण्याप्रती कोटकची (Kotak Mahindra Bank) बांधिलकी यातून अधोरेखित होते. आरोग्य तपासणीशिवाय, शिबिरांमध्ये उपस्थित असलेले समुपदेशक चालकांना दैनंदिन आरोग्यविषयक सवयींबाबत शिक्षित करतील आणि त्यांच्या गरजांनुसार आखण्यात आलेल्या अनेक सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करतील. प्रत्येक शिबिरामध्ये ‘डॉक्टर्स फॉर यू’ डॉक्टरांची व परिचर्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. (Kotak Mahindra Bank)
(हेही वाचा – ICC Test Ranking : जसप्रीत बुमराहचं अव्वल स्थान कायम, रिषभ पंत पहिल्या दहांत)
कोटक महिंद्रा बँकेतील (Kotak Mahindra Bank) लॉजिस्टिक्स व पायाभूत सुविधा विभागाचे अध्यक्ष अमित मोहन म्हणाले, “आपल्या अर्थव्यवस्थेची चाके फिरती ठेवण्यासाठी व्यावसायिक वाहनचालकांना दीर्घकाळ काम करावे लागते, यात त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ‘सेहत का सफर’च्या माध्यमातून त्यांची काळजी घेऊन तसेच त्यांना सहाय्य करून आम्ही त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहोत. यावर्षी आम्ही या उपक्रमाचा विस्तार करून ४५ ठिकाणी शिबिरे घेणार आहोत, जेणेकरून आणखी चालकांना याचा लाभ मिळेल आणि त्यांना अधिक निरोगी, अधिक सुरक्षित आयुष्य जगण्याची क्षमता मिळेल.’ २०२३ साली सुरू झालेल्या ‘सेहत का सफर’ या उपक्रमामध्ये गेल्या दोन वर्षांत ६० वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यामुळे ६,००० वाहनचालकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. (Kotak Mahindra Bank)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community