खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने आपल्या कर्ज दरात म्हणजेच एमसीएलआर (MCLR)मध्ये वाढ करण्याचे जाहीर केले आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्यानंतर गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जासह इतर प्रकारचे कर्ज महागणार आहे. रिझर्व्ह बँकद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे जरी महागाई नियंत्रणात येत असली तरी एकापाठोपाठ एक रेपो रेट वाढवण्याच्या निर्णयाचा परिणाम कर्जदारांवर होत आहे.
माहितीनुसार, कोटक बँकेने वेगवेगळ्या कर्ज विभागांसाठी वेगवेगळ्या कालावधीच्या एमसीएलआरमध्ये १० ते ३० बेस पॉईंट्स वाढवले आहेत. बँकेच्या या घोषणेनंतर वेगवेगळ्या कालावधीवर व्याज ८.१५ टक्क्यावरून ९.१५ टक्क्यांदरम्यान झाले आहे. १५ जानेवारी २०२३ पासून बँकेचे हे नवे दर लागू झाले आहेत.
EMI वाढणार
एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याने मुदत कर्जावरील ईएमआय वाढण्याची शक्यता आहे. शिवाय वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.
एमसीएलआर म्हणजे काय?
एमसीएलआर ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर निश्चित करतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करायचे.
(हेही वाचा – सरकारी नोकऱ्यांसाठी नवा नियम लागू! अन्यथा वार्षिक वेतनवाढ रोखणार)
Join Our WhatsApp Community