महाराष्ट्राची तहान भागवणाऱ्या कोयना धरणातल्या पाण्याची पातळी खालावत चालल्यामुळे कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथा टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद झाली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्याने पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्याची वीजनिर्मितीही ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. धरणातील पाणीसाठ्याच्या अभावामुळे कोयना वीज प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे.
चौथा टप्पा त्याचबरोबर उरलेले टप्पे पाण्याअभावी बंद होण्याच्या मार्गावर असतानाच चिपळूण परिसरात पाणी टंचाई उद्भवण्याचा मोठा धोका आहे. कोयनेच्या अल्पजलावर चिपळूण व वाशिष्ठी नदीलगतची गावे तसेच लोटे, गाणे-खडपोली, आरजीपीपीएल, खेर्डी येथील औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत.
वीजेची नितांत गरज लक्षात घेता सकाळी व संध्याकाळी कोयना वीज प्रकल्प चालवला जातो. पाण्यापासून निर्माण होणारी वीज फार स्वस्त आहे. कोयना धरणाची जलसाठवण क्षमता १०५ टीएमसी असून १ जूनपासून जलवर्ष सुरू होते त्यानंतर धरणात जमा होणारे पावसाचे पाणी मोजले जाते. परंतू जून महिना निम्मा संपत आला तरीही पावसाने अजूनही हवा तसा जोर धरला नाही. सध्या कोयना धरणामध्ये ११.७४ टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक आहे. चौथा टप्पा पूर्णपणे ठप्प झाला असून पावसाचे आगमन लवकर झाले नाही तर भारनियमनाचे संकट ओढावेल.
Join Our WhatsApp Community