‘कोयना’ने गाठली शंभरी

अर्ध्या महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या कोयना धरणाचा पाणीसाठा संपूर्ण भरला आहे. गुरुवारी, २२ सप्टेंबर रोजी धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला. कोयना धरणात १०५.२५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा 

धरणाची पाणी साठवण्याची क्षमता संपलेली असल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलण्यात आले. यातून ९ हजार ५४६ क्यूसेक व पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून १ हजार ५० क्यूसेक असे प्रति सेकंद १० हजार ५९६ क्यूसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे  नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून प्रति सेकंद सरासरी ६ हजार ४०२ क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. १ जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे ४,४३५ मिलिमीटर, नवजा ५,३९१ मिलिमीटर व महाबळेश्वर येथे ५,७९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here