कोयना परिसर पर्यटन हब बनविणार; पर्यटनमंत्री Shambhuraj Desai यांचे विधान

28
कोयना परिसर पर्यटन हब बनविणार; पर्यटनमंत्री Shambhuraj Desai यांचे विधान

सातारा जिल्ह्यातील कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कोयनानगर रिसॉर्टचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील पर्यटन विषयक कामांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, संचालक बी. एन. पाटील, अधिक्षक अभियंता बोरसे तर दूरदृश्य प्रणाली द्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवन’चे भूमिपूजन)

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कोयना धरण आणि जलाशय परिसर हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून, येथे पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी पर्यटनविषयक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये एमटीडीसी रिसॉर्टचा संपूर्ण कायापालट करून आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत.

कोयनानगर येथील पर्यटन विभागाच्या रिसॉर्टची सद्य स्थिती देसाई (Shambhuraj Desai) यांनी जाणून घेतली. देसाई म्हणाले, या ठिकाणी पाच व्ही. व्हीआयपी, पाच व्हीआयपी आणि उर्वरित ठिकाणी कॉटेज तयार करण्याचा प्रस्ताव तयार करावा. या रिसॉर्टच्या जागेसंदर्भात काही प्रश्न असल्याने स्थानिक स्तरावर सोडविण्यात यावेत.

(हेही वाचा – स्वारगेट एसटी स्टँडवरील ‘त्या’ प्रकरणावर उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा खुलासा; म्हणाले, आरोपी दत्तात्रय गाडे…)

कोयनानगर येथील नेहरू उद्यान विकसित करण्यासंदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. सध्या तीन एकर जागेवर असलेल्या या उद्यानाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर उद्यान वाढवण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रकल्पाच्या कामांमधील अडीअडचणींचा आढावाही पर्यटनमंत्री देसाई (Shambhuraj Desai) यांनी यावेळी घेतला. या उपक्रमांमुळे कोयनानगर परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असा विश्वास पर्यटनमंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.