Krida Mahakumbh : मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून भरणार ‘क्रीडा महाकुंभ’

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये येत्या २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ आयोजित केला जाणार आहे. या क्रीडा महाकुंभात सोळा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

1223
Krida Mahakumbh : नोंद गिनीज बुक रेकॉर्ड्समध्ये
Krida Mahakumbh : नोंद गिनीज बुक रेकॉर्ड्समध्ये

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये येत्या २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ (Krida Mahakumbh) आयोजित केला जाणार आहे. या क्रीडा महाकुंभात (Krida Mahakumbh) सोळा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचे प्रारंभ कुर्ला येथील क्रीडांगणात होणार असून याचा बक्षीस समारंभ हा मालाड येथील क्रीडा संकुलात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित होणार आहे. (Krida Mahakumbh)

(हेही वाचा – BMC : त्वरा करा… मोफत कचरापेटी मिळवा!)

एकूण १७ खेळांचा समावेश

उपनगराचे पालकमंत्री ऍड मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या संकल्पनेतून य क्रीडा महाकुंभाचे (Krida Mahakumbh) आयोजन मुंबईत होणार आहे. या स्पर्धेमध्ये पंजा लढवणे, दोरीच्या उड्या, मल्लयुध्द, पावनखिंड दौड, शरीर सौष्ठव, मल्लखांब, दंड बैठक आदी वैयक्तीक आणि लगोरी, फुगडी, कबड्डी, ढोलताशा पथक, लंगडी, विटी दांडु, लेझीम, रस्सीखेच आणि खो-खो आदी सांघिक अशा एकूण १७ खेळांचा समावेश आहे. (Krida Mahakumbh)

मुंबईतील एकूण २७ मैदानांवर ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक विभागांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार असून तब्बल २३ दिवस ही स्पर्धा होणार आहे, असे लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी स्पष्ट केले. (Krida Mahakumbh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.