देशभरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहे, त्याचा संसर्ग हरिद्वार येथील कुंभ मेळ्यातही झाला आहे. नुकतेच निर्वाणी आखाड्यातील महामंडलेश्वरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कुंभ नगरीत तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. आतापर्यंत कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान पार पडले आहेत. अजून एक शाही स्नान बाकी आहे, जे २७ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र आता हा कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि जी से आज फोन पर बात की। सभी संतों के स्वास्थ्य का हाल जाना। सभी संतगण प्रशासन को हर प्रकार का सहयोग कर रहे हैं। मैंने इसके लिए संत जगत का आभार व्यक्त किया।
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
काय म्हटले पंतप्रधान?
- कोरोना परिस्थिती लक्षात घेता इथून पुढचा कुंभमेळा केवळ प्रतिकात्मक ठेवावा. यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला ताकद मिळेल.
- याबाबत जुना अखाडाचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्यासोबत चर्चा केली आहे.
- कोरोनाची लागण झालेल्या साधूंबाबत विचारपूस केली.
- तसेच, सर्व अखाड्यांमार्फत प्रशासनाला केल्या जाणाऱ्या सहकार्याबाबत कृतज्ञताही व्यक्त केली.
- उर्वरित कुंभमेळ्यातील सहभाग हा प्रतिकात्मक असावा.
- यासाठी सर्वच साधू आणि भाविकांऐवजी काही प्रतिनिधींनी याला हजेरी लावावी.
(हेही वाचा : हरिद्वारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव: निरंजनी आखाड्याने केली कुंभमेळा संपल्याची घोषणा )
काय म्हणाले स्वामी अवधेशानंद?
- लोकांनी कुंभमेळ्यात स्नानासाठी येऊ नये.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे.
- इतरांच्या प्राणांची सुरक्षा बाळगणेही पुण्याचे काम आहे.