Kunal Kamra Case : वांद्र्यातील हॅबीटेट हॉटेलची तपासणी; पण कारवाईत चालढकल

110
Kunal Kamra Case : वांद्र्यातील हॅबीटेट हॉटेलची तपासणी; पण कारवाईत चालढकल
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत सादर केले त्या हॉटेल वजा क्लबची तपासणी केली जात असली तरी अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली गेलेली नाही. त्यामुळे या हॉटेलवरील कारवाई आजही गुलदत्यातच अडकली आहे. त्यामुळे या हॉटेल तथा हॉटेलवजा क्लबवर कारवाई न करण्यासाठी कुणाचा दबाव येत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. (Kunal Kamra Case)

(हेही वाचा – Dhananjay Munde यांची याचिका फेटाळली; करुणा शर्मा यांच्या बाजूने न्यायालयाचा निर्णय)

कुणाल कामरा यांनी खार पश्चिम येथील ज्या हॅबीटेट हॉटेल/क्लब मधील आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केले. त्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी या क्लबच्या सभागृहाची तोडफोड केली. यानंतर कामरा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. दरम्यान, महापालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॅबीटेट हॉटेल/क्लबच्या बाहेरील तात्पुरत्या शेडचे बांधकाम तोडले. क्लबच्या बाहेरील बाजूस हे तात्पुरती बांधकाम होते. ते महापालिकेच्या चमूने तोडून टाकले. तसेच हे हॉटेल पुढील तपासणी होईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या क्लबची दिवसभर पाहणी करून मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकाम याची तपासणी करण्यात आली. सलग दोन दिवस ही तपासणी करण्यात आली होती. (Kunal Kamra Case)

(हेही वाचा – Shivaji Park मधील विहिरी गेल्या कुठे? बाहेरुन टँकरद्वारे आणून शिंपडले जाते मैदानात पाणी)

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या जागेत हा कार्यक्रम सादर झाला होता, ती जागा तळघराच्या जागेत आहे. तळघराच्या जागेत मनुष्य वावर नसावा, ती जागा सामान ठेवण्याची असते. त्यामुळे एकाप्रकारे नियमांचा भंग केलेला आहे. त्यामुळे याबाबतीत त्यांच्यावर कारवाई केलीच जाणार आहे. शिवाय मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष वापर यात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास त्यावरही हातोडा चालवला जाणार होता. परंतु, प्रत्यक्षात तपासणी झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची नोटीस संबंधित हॉटेलला बजावली गेलेली नाही. तब्बल आठ दिवस उलटूनही यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने ही कारवाई न होण्यामागील कारणे काय असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांची बदली होवून त्यांच्या जागी दिनेश पल्लेवाड यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पल्लेवाड हे नव्याने नियुक्त झाल्याने ते आधी विभागाची कार्यपद्धती आणि विभागाची भौगोलिक परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. (Kunal Kamra Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.