Kundanika Kapadia: आपल्या साहित्यातून फेमिनिज्म मांडणार्‍या कुंदनिका कापडीया

१९४८ मध्ये त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीशी संबंधित भावनगर येथील सामलदस महाविद्यालयातून इतिहास आणि राजकारणात बीए पूर्ण केले.

191
Kundanika Kapadia: आपल्या साहित्यातून फेमिनिज्म मांडणार्‍या कुंदनिका कापडीया
Kundanika Kapadia: आपल्या साहित्यातून फेमिनिज्म मांडणार्‍या कुंदनिका कापडीया

गुजरातमधील लिंबडी येथे ११ जानेवारी १९२७ रोजी जन्मलेल्या कुंदनिका कपाडिया (Kundanika Kapadia) म्हणजे गुजराती साहित्यातलं मोठं नाव. त्यांनी लिहिलेल्या ‘सात पगला आकाशमा’ या कादंबरीला १९८५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. त्यांनी गोध्रा येथून आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे १९४२ मध्ये त्यांनी छोडो भारत चळवळीत भाग घेतला होता.

१९४८ मध्ये त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीशी संबंधित भावनगर येथील सामलदस महाविद्यालयातून इतिहास आणि राजकारणात बीए पूर्ण केले. मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून संपूर्ण राजकारणात त्यांनी एम.ए. करण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव त्या परीक्षा देऊ शकल्या नाहीत. १९८५ मध्ये त्यांनी वलसाड जवळ नंदिग्राम नावाचे आश्रम सुरू केले. आश्रमातील साधक त्यांना इशामा म्हणायचे.

(हेही वाचा – Kailash Satyarthi: ‘ह्युमेनीटेरियन’ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय)

१९६८ मध्ये गुजराती कवी मकरंद दवे यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांनी यात्रिका आणि नवनीत मासिकाचे संपादित केले आहे. ‘स्नेहधन’ या टोपण नावाने त्यांनी साहित्य कलाकृती निर्माण केली. परोध थाटा पहेला ही पहिली कादंबरी १९६८ रोजी प्रकाशित झाली. त्यानंतर अग्नीपिपासा, सात पगला आकाशमां या कादंबरीला प्रचंड बहुमान मिळाला. या कादंबरीतून त्यांनी फेमिनिज्म मांडले.

जन्मभूमी वर्तमानपत्राद्वारे आयोजित कथा स्पर्धेत ‘प्रेमना आंसू’ या त्यांच्या कथेला दुसरं पारितोषिक मिळालं. त्यानंतर त्यांनी अनेक कथा लिहिल्या आणि पहिला कथासंग्रह १९५४ रोजी ‘प्रेमना आंसू’ या नावाने प्रकाशित झाला. ‘वधू ने वधू सुंदर’, ‘कागलनी होडी’, ‘जवा दैशू तमने’ इत्यादी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

‘गुजराती साहित्य परिषद’ आणि ‘गुजराती साहित्य अकादमी’ने त्यांचा गौरव केला आहे. १९८४ मध्ये त्यांना धानजी कांजी गांधी सुवर्ण चंद्रकदेखील प्राप्त झाला. ३० एप्रिल २०२० रोजी वलसाड येथील नंदिग्राम आश्रममध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.