मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) तीन नवे पाहुणे आले आहेत. नामिबियातून आणलेल्या ज्वाला नामक मादी चित्ताने ३ पिलांना जन्म दिला आहे. या नवजात शावकांची प्रकृती उत्तम असल्याचे कुनो पार्कच्या वैद्यकीय पथकाने म्हंटले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या पिलांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.
(हेही वाचा – Balasaheb Thackeray Birth Anniversary : पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली)
भारतामध्ये वन्यजीवांची अशाच प्रकारे भरभराट झाली पाहिजे – पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘कुनोचे नवे (Kuno National Park) शावक, ज्वाला नावाच्या नामिबियन चितेने तीन शावकांना जन्म दिला आहे, नामिबियन चित्ता आशाने तिच्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांनंतर ही आणखी एक आनंदाची बातमी आहे. सर्व वन्यजीव प्रेमींना हार्दिक शुभेच्छा. भारतामध्ये वन्यजीवांची (Kuno National Park) अशाच प्रकारे भरभराट होत राहिली पाहिजे. चीता प्रकल्प यशस्वी होवो.” असे यादव यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
(हेही वाचा – National Bravery Award : नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान)
Kuno’s new cubs!
Namibian Cheetah named Jwala has given birth to three cubs. This comes just weeks after Namibian Cheetah Aasha gave birth to her cubs.
Congratulations to all wildlife frontline warriors and wildlife lovers across the country.
May Bharat’s wildlife thrive… pic.twitter.com/aasusRiXtG
— Bhupender Yadav (@byadavbjp) January 23, 2024
चित्त्यांच्या संख्येत वाढ –
मादी चित्ता ज्वालाने मार्च २०२३ मध्ये ४ शावकांना जन्म दिला होता. मात्र, यातील एकच पिल्लू हे जिवंत राहू शकले. त्यानंतर कुनो व्यवस्थापनाने शावकांच्या मृत्यूचे कारण तीव्र उष्णता असल्याचे सांगितले होते. ज्वाला ही पूर्वी शिया नावाने ओळखली जात होती, नंतर तिचे नाव ‘ज्वाला’ ठेवण्यात आले. कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) गेल्या महिनाभरात आतापर्यंत ६ पिल्ले जन्माला आली आहेत. नामिबियातील ज्वाला या मादी चित्तेने ३ पिल्लांना जन्म दिला आहे. तर, आशा नामक मादी चित्ताने ३ जानेवारी रोजी तीन पिल्लांना जन्म दिला होता. हे सर्व चित्ते निरोगी असून केएनपी टीम त्यांची विशेष काळजी घेत आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये आता हळूहळू चित्त्यांची संख्या वाढत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community