Kuprej Garden : कुपरेज उद्यान उजळून निघणार

मुंबई सुशोभीकरणाअंतर्गत सध्या विविध भागातील पदपथ, रस्ते दुभाजक, वाहतूक बेट, विद्युत पोल रोषणाई, सिग्नल पोल, समुद्र किनारे, उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेचे सुशोभीकरण, रंगरंगोटी व विद्युत रोषणाई व सौंदर्यीकरण केले जात आहे.

325
Kuprej Garden : कुपरेज उद्यान उजळून निघणार
Kuprej Garden : कुपरेज उद्यान उजळून निघणार

मुंबई सुशोभीकरण अंतर्गत आता दक्षिण मुंबईतील हेरिटेज गार्डन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुपरेज गार्डनचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. या सुशोभीकरणातंर्गत हेरिटेज वीजेचे खांब बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता कुपरेज उद्यान आणखीन उजळून निघणार आहे. (Kuprej Garden)

मुंबई सुशोभीकरणाअंतर्गत सध्या विविध भागातील पदपथ, रस्ते दुभाजक, वाहतूक बेट, विद्युत पोल रोषणाई, सिग्नल पोल, समुद्र किनारे, उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेचे सुशोभीकरण, रंगरंगोटी व विद्युत रोषणाई व सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यानुसारच महापालिकेच्या ए विभागातील कुपरेज गार्डनचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. (Kuprej Garden)

(हेही वाचा – Cocaine Capsules Seized : नऊ कोटींच्या कोकेनने भरलेल्या कॅप्सूल जप्त, दोन परदेशी नागरिकांना अटक)

या कामांसाठी सुमारे १ कोटी ११ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या कामासाठी स्टार इलेक्ट्रीक या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सन २०१६मध्ये या हेरिटेज उद्यानाचे हेरिटेजनुसार उद्यानाला स्वरुप देण्यात आले होते. हेरिटेज दर्जानुसारच विजेचे पोल आणि विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. (Kuprej Garden)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.