Kurla Best Accident : ‘त्या’ घटनेनंतर भाडेतत्वावरील बस चालकांची होणार ‘ही’ टेस्ट

169

मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये सोमवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं (Mumbai Kurla Bus Accident) अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या २० ते २२ वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि बस चालकांकडून होणारे अपघात टाळण्यासाठी आता भाडे तत्वावरील बस चालविणाऱ्या कंत्राटी चालकांची सरप्राईज ‘ब्रिदींग टेस्ट’ (best bus driver breathing test) करण्याचा निर्णय घेतला आहे. (Kurla Best Accident)

बेस्ट उपक्रमात काम करणाऱ्या अधिकृत बस चालक आणि वाहक यांना कडक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र भाडे तत्वावरील बसगाड्यांवर कार्यरत बस चालक व वाहक यांना असे कडक नियम लागू नाहीत. त्यामुळे भाडे तत्वावरील बस चालक हे ऑन ड्युटी असताना चक्क वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून ते प्राशन करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भाडे तत्वावरील बस गाड्यांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्याची गंभीर दखल घेत बेस्ट (Best Bus) उपक्रमाने भाडे तत्वावरील बसचालक आणि वाहक यांना कडक नियम लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाडे तत्वावरील बस चालकाने, वाहकाने मद्य सेवन केले आहे की नाही, याबाबत त्यांची सरप्राईज ब्रिदींग टेस्ट (Breathing test) घेण्यात येणार आहे. त्यामुळे चालकाने मद्यपान केले आहे का, ते तपासणीतून समजणार आहे.

(हेही वाचा – मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत आता ‘Artificial Intelligence’ चा वापर)

अशी होणार कार्यवाही

बेस्टच्या स्वमालकीच्या बसवर असलेल्या ड्रायव्हरची अशाप्रकारे ब्रिथ अनालायझर टेस्ट (Breath Analyzer Test) आधीपासूनच करण्यात येत आहे. तर आता भाडेतत्त्वावरील ड्रायव्हरची ब्रिथ ॲनालायझर टेस्ट करण्यात येणार आहे. यामध्ये आगारातून बस प्रवासासाठी निघताना किंवा कोणत्याही ठिकाणी बस थांबवून ही टेस्ट करण्यात येईल. यासाठी अधिकाऱ्यांची टीम तैनात करण्यात येईल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.