Kurla Best Bus Accident : ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तानंतर तात्काळ कुर्ला स्थानकातून बेस्ट बस सेवा सुरू

179
Kurla Best Bus Accident : 'हिंदुस्थान पोस्ट'च्या वृत्तानंतर तात्काळ कुर्ला स्थानकातून बेस्ट बस सेवा सुरू
  • प्रतिनिधी

कुर्ला पश्चिम येथे सोमवारी झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातानंतर तब्बल ४ दिवस बंद ठेवण्यात आलेली कुर्ला स्थानक ते कुर्ला आगार दरम्यानची बेस्ट बस सेवा ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तानंतर शुक्रवारी दुपारी ३ वाजता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पोलीस आणि बेस्ट प्रशासनामध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावातून कुर्ला स्थानक ते कुर्ला आगार दरम्यानची बस ४ दिवस बंद ठेवण्यात आली होती. बेस्ट बस बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना रिक्षावर अवलंबून राहावे लागले होते. रिक्षा चालकांनी या संधीचा फायदा घेऊन प्रवाशांची लूट सुरू केली होती. (Kurla Best Bus Accident)

कुर्ला स्थानक पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. कुर्ला पश्चिम येथून अंधेरी स्थानकाकडे निघालेल्या ए-३३२ या बेस्ट बस वरील नियंत्रण सुटल्याने ३०० मीटर अंतरापर्यंत ही बस अनेक वाहने, पादचाऱ्यांना चिरडत आंबेडकर नगरच्या कमानीवर आदळून थांबली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला तर ४२ जण जखमी झाले असून जवळपास २५ ते ३० वाहनांचे नुकसान झाले. या अपघातानंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने कुर्ल्यात तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेनंतर कुर्ला पश्चिम स्थानक ते कुर्ला आगार दरम्यान बेस्ट बस सेवा बंद करण्यात आली होती. बेस्ट सेवा पुन्हा कधी सुरू होणार याबद्दल बेस्ट प्रशासनाकडून काहीही सांगण्यात येत नव्हते. (Kurla Best Bus Accident)

(हेही वाचा – Kurla Bus Accident : बेस्ट बस बंदचा चौथा दिवस; पोलीस आणि बेस्ट प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचा फटका प्रवाशांना)

कुर्ला स्थानकातून बेस्ट बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बेस्ट बस बंदचा फटका बसत होता. वयोवृद्धांचे हाल होत होते. तसेच मुजोर रिक्षा चालकांकडून लूट सुरू होती. शुक्रवारी सकाळी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने बेस्ट बस सेवा केव्हा सुरू करणार याबाबत बेस्टचे जनसंपर्क अधिकारी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांकडे बोट दाखवून पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेला घेऊन सेवा बंद करण्यास सांगितले होते. पोलिसांकडून बस सुरू करण्याची सूचना मिळाल्यानंतर तात्काळ बस सेवा सुरू करू असे जनसंपर्क अधिकारी सावंत यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितले होते. दरम्यान ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) गणेश गावडे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही बेस्ट सेवा बंद करण्याचा आदेश बेस्ट प्रशासनाला दिलेला नसल्याचे सांगण्यात आले, उलट आम्ही त्यांना अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तुमची मोमेंट सुरू करू शकता असे सांगितले होते, असे गावडे ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना म्हणाले. (Kurla Best Bus Accident)

दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आल्यानंतर पोलीस आणि बेस्ट प्रशासनात समन्वय आभास असल्याचे आढळून आले. ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने हे वृत्त ऑनलाईन पब्लिश करताच काही तासांनी बेस्ट प्रशासनाकडून दुपारी ३ वाजता कुर्ला स्थानकातून बेस्ट बस सेवा सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. कुर्ला आगारकडे जाणाऱ्या बसेसला दुपारी कुर्ला स्थानकाकडे वळविण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून कुर्ला स्थानकातून अखेर ४ दिवसांनी बेस्ट बस सेवा सुरू करण्यात आली आहे. (Kurla Best Bus Accident)

New Project 2024 12 13T190051.958

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली

वरिष्ठ वाहतूक अधिकारी लक्ष्मण महाले यांच्या चौकशीची मागणी 

या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बेस्ट प्रशासनाकडे तात्काळ बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती, नागरिकांना होणाऱ्या त्रासावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे गलगली यांनी आपल्या मागणीत म्हटले होते. मागील ३ दिवसांपासून चुकीची माहिती देत बस सेवा स्थगित करत सामान्य प्रवाश्यांना वेठीस धरणारे वरिष्ठ वाहतूक अधिकारी लक्ष्मण महाले यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडे केली आहे. (Kurla Best Bus Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.