Kurla Best Bus Accident : अपघातग्रस्त बसमधील सीसीटीव्ही ठरणार महत्त्वाचा पुरावा

126
Best Undertaking : बेस्ट समितीने नाकारलेल्या संस्थेचा प्रस्ताव प्रशासनाने केला मंजूर; रवी राजा यांचा ओला कंपनीबाबत गंभीर आरोप
  • प्रतिनिधी 

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर जप्त केला आहे. त्यातील फुटेजच्या आधारे अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अपघातग्रस्त बसमधील प्रवासी हे या भीषण अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असून त्यांची साक्ष ही आरोपीला शिक्षेपर्यंत पोहचवू शकते अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली आहे. (Kurla Best Bus Accident)

(हेही वाचा – Sudhir Mungantiwar यांचा सिद्धरामय्या सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, सावरकारांचा अपमान करणाऱ्यांनो तुमचा…)

कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर कुर्ला पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात सुरू केले आहे. दरम्यान पोलिसांनी अपघातग्रस्त बेस्ट बसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर ताब्यात घेतला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती काढून त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहे. अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे प्रवासी हे प्रत्यक्षदर्शी असून त्यांचा जबाब महत्त्वाचा असणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Kurla Best Bus Accident)

(हेही वाचा – Best Bus : खासगी बस चालकात प्रशिक्षणाचा अभाव)

बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे आमच्यासाठी चांगला पुरावा असू शकतो, अपघातावेळी बसमधील परिस्थिती काय होती, चालकाकडून काय चुकी झाली हे देखील समोर येऊ शकते अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपीला शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि प्रत्यक्षदर्शी प्रवासी हे पुरावे महत्त्वाचे ठरतील असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Kurla Best Bus Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.