- विशेष प्रतिनिधी, मुंबई
बेस्टमध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष २०१८ ते २०२१ या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपाने या प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे या बाबींचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असे नमूद करत बेस्ट महाव्यवस्थापक म्हणून आपण याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा आणी मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना तातडीने मदत करावी तसेच दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी महापालिका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मृत नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्या
कुर्ला पश्चिम येथील सोमवारी ०९ डिसेंबर रोजी रात्री बेस्ट बस अपघातात चालक व कंत्राटदार यांच्या चुकीमुळे ज्यांचे नाहक बळी गेलेत अशा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्याव, आणि जखमी नागरिकांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी व खर्च बेस्ट प्रशासनाने उचलावा. तसेच जखमी नागरिकांना रुपये ५० हजार ते दोन लाख पर्यंत झालेल्या जखमेच्या प्रमाणात तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी महापालिकेचे भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Kurla Best Bus Accident)
(हेही वाचा – Kurla Bus Accident प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा !)
चार नागरिकांचा नाहक बळी
बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना दिलेल्या निवेदनात भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी सोमवारी ९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघाताबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून घेत, या बस अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या चार नागरिकांचा नाहक बळी गेला असून तो आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. अजून ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा असा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे आणि बेस्ट प्रशासनाला व जनप्रतिनिधींना अंतर्मुख करून विचार करायला लावणारा आहे, असे म्हटले आहे. (Kurla Best Bus Accident)
त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढले
आजमितीस बेस्ट ताफ्यातील ३००० बेस्ट बसेसपैकी २००० बेस्ट बसेस या भाडेकरार तत्त्वावर वेट लिजवर चालविण्यात येतात. या भाडेकरार तत्त्वावर बसेसचा पुरवठा करणारा कंत्राटदारच या बससाठी चालक आणि वाहक यांची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की, कंत्राटदाराने नेमलेले बस चालक हे नवीन असतात आणि त्यामुळे त्यांना मुंबईच्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बसेस चालवताना अडचण येते. त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. (Kurla Best Bus Accident)
…तर भाजपा ते सहन करणार नाही!
गेल्या वर्षभरात सुमारे आठ नागरिकांनी बेस्टच्या अपघातात जीव गमवाला आहे, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत शिंदे यांनी याची सखोल चौकशी करून या घटनांसंदर्भात जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ एका वाहन चालकावर कारवाई करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल, तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही असाही इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. (Kurla Best Bus Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community