मुंबईच्या कुर्ला परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. डिसेंबरच्या रात्री नियंत्रण सुटलेल्या बसने अनेक पादचाऱ्यांबरोबरच वाहनांनाही धडक दिली. कुर्ला परिसरात सोमवारी रात्री १०.४५ च्या सुमारास मोठा अपघात झाला. बेस्टच्या ३३२ क्रमांकाच्या बसने नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक वाहने आणि सुमारे ३५ जणांना चिरडले. एका सोसायटीची भिंत तोडून नियंत्रणाबाहेर गेलेली बस शेवटी थांबली. या भीषण अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले. नियंत्रणाबाहेर गेलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले आहे. (Kurla Bus Accident)
(हेही वाचा – Maharashtra Karnataka Border Issue : सीमावर्ती भागातील मराठी बांधवांवर अत्याचार; विधान परिषदेत तीव्र पडसाद)
अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला (Sanjay More) पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील (Mumbai Kurla Best Bus Accident) बस स्थानक बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मद्य प्यायल्याचा दावा कुटुंबियांनी फेटाळला
या भीषण अपघाताबाबत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे आमदार लांडे यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी बस चालक संजय मोरे (५०) याला ताब्यात घेतले आहे. संजय मोरेने दावा केला आहे की, ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. मात्र, बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने बसवर नियंत्रण ठेवू शकला नाही, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. राज्य परिवहन विभागाचे निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी बसचे ब्रेक ठीक आहेत. याबाबत सविस्तर चौकशी करण्यात येईल. चालकाच्या कुटुंबियांनी चालकान मद्यप्राशन केल्याचे आरोप फेटाळले आहेत. (Kurla Bus Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community