लोकल (Central Railway) प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व्हावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला स्थानकांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र भूसंपादनाच्या अडचणीमुळे हा मार्ग रखडून त्याचा खर्च भरमसाट वाढला. आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याने हा प्रकल्प वेगाने पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील १ हजार २६३ चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन राज्य सरकारकडून यासाठी मस्जिद स्थानकाजवळ सीएसएमटी आणि भायखळा परिसरात जमीन आहे. या जागेची मोजणी सुरू आहे.
…म्ह्णून लोकल सेवा विस्कळीत व्हायची
दोन नवीन मार्ग जोडण्याचा पहिला टप्पा कुर्ला ते परळ, तर दुसरा टप्पा परळ- सीएसएमटी दरम्यान आहे. कुर्ला ते परळच्या पट्टयात रेल्वेला दहा हजार चौरस मीटर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी सहा हजार चौरस मीटर जमीन आधीच संपादित केली आहे. कुर्ल्यातील स्वदेशी मिलमधील जमिनीचे संपादन सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या(Central Railway) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचवी, सहावी मार्गिका स्वतंत्र नाही. त्यामुळे जलद लोकलच्या उपलब्ध दोन मार्गिकांवरूनच मेल, एक्स्प्रेस गाड्या धावतात. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होते. नियमित वेळापत्रक कोलमडून पडत असल्याने स्वतंत्र मार्गिका सुरू करण्याचे धोरण आखले.
(हेही वाचा Mumbai Local : महिलांच्या लोकल प्रवासाच्या सुरक्षेसाठी रेल्वेचे सर्वेक्षण; विचारणार २१ प्रश्न)
प्रकल्प १ हजार ३३७ कोटी रुपयांपर्यंत पोहचला
हा मार्ग पूर्ण झाल्यास लोकलचा वेग वाढून मुंबईकरांचा प्रवास जलगतीने होईल. लोकल फेऱ्यांच्या संख्येत भर पडेल. मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर दिवसागणिक प्रवाशांची गर्दी वाढत असून लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकलचे वेळापत्रक बिघडत आहे. उपनगरी रेल्वे प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी कुर्ला ते सीएसएमटीपर्यंत पाचवी सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००८-०९ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. तेव्हा या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८९० कोटी रुपये होता; मात्र भूसंपादनाच्या अडचणींमुळे अनेक वर्षे हा प्रकल्प खोळंबला आहे. या प्रकल्पाचा खर्च एक हजार ३३७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
Join Our WhatsApp Community