गुजरातच्या कच्छमध्ये (Kutch Earthquake) रविवार २८ जानेवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू भचावच्या उत्तर-ईशान्येस २१ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती अजून समोर आलेली नाही.
(हेही वाचा – Anton Chekhov : जगभरातील समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेले रशियन कथाकार आणि नाटककार आंतोन चेखव)
गुजरातसह ‘या’ भागात जाणवले भूकंपाचे झटके –
देशात गुजरातसोबतच (Kutch Earthquake) दिल्ली-एनसीआर, पंजाबसह चंदीगड आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील भूकंपामुळे जमीन हादरली. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हिंदुकुश प्रदेशात रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.२ इतकी मोजण्यात आली.
भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्समध्ये टक्कर –
गेल्या काही दिवसापासून भारतात सातत्याने भूकंपाचे (Kutch Earthquake) धक्के जाणवत आहेत. तिबेटच्या खाली असलेल्या भारतीय टेक्टोनिक प्लेट फुटत आहे. एका नव्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय टेक्टोनिक प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली जात असल्याचे वैज्ञानिकांच्या नवीन विश्लेषणातून समोर आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community