Kuwait Fire: कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू, ५ भारतीयांचा समावेश

115
Kuwait Fire: कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू, ५ भारतीयांचा समावेश

कुवेतमधील कामगारांच्या एका इमारतीत बुधवारी, (१२ जून) लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आले आहे. कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात पहाटे ६ मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात आग लागली. (Kuwait Fire)

कुवेतमधील दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात असलेल्या एका सहा मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या इमारतीत सर्व रहिवासी एकाच कंपनीमधील कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळी या कामगारांच्या इमारतीच्या स्वयंपाकघरात भीषण आग लागली. या इमारतीत जवळपास १६० लोक राहत होते. यातील बरेच कामगार भारतीय होते. हाती आलेल्या माहितीनुसार, या आगीत होरपळून ४१ जणांचा मृत्यू झालाय, यात ५ भारतीय लोकांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. (Kuwait Fire)

(हेही वाचा – Russia and Ukraine War: रशियन लष्करात भरती झालेल्या २ भारतीयांचा युक्रेनने केलेल्या हल्ल्यात मृत्यू)

बहुतांश भारतीयांचा समावेश
भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनीही याची माहिती दिलीय. आगीत ४१ जणांच्या मृत्यूवर जयशंकर यांनी दु: ख व्यक्त केलंय. जयशंकर यांनी आपल्या अधिकृत ‘X’वर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. ४० हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि ५० हून अधिक जण जखमी झाले असून ते रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान आगीत मृत पावलेल्या लोकांमध्ये बहुतांश भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. (Kuwait Fire)

भारतीय राजदूतांनी व्यक्त केल्या भावना…
दरम्यान भारतीय राजदूतांनी आग लागलेल्या कॅम्पला भेट दिली. या घटनेप्रकरणी माहिती देताना जयशंकर म्हणाले, ‘आम्ही पुढील माहितीची वाट पाहतोय. ज्यांनी दुःखदपणे आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना. जखमी झालेल्या व्यक्ती लवकर आणि पूर्ण बरे व्हाव्यात. याबाबत आमचा दूतावास सर्व संबंधित लोकांना पूर्ण मदत करेल.

हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क…
कुवेतमध्ये भारतीय राजदुतांनी ‘X’वर आपतकालीन हेल्पलाइन नंबर दिला आहे. +९६५-६५५०-५२४६ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करून या घटनेप्रकरणी माहिती मिळवता येईल. दूतावासानेही शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे. कुवेतच्या एकूण लोकसंख्येपैकी २१ टक्के (१ दशलक्ष) भारतीय आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.