बोरीवलीतील एल.टी. मार्ग, एस.व्ही.मार्गावरुन चालायचे कसे? नगरसेवकांचं लक्ष कुठे?

आधीच फूटपाथ अरुंद, त्यातच चालण्यास समतल नाही आणि तिथे कपडे व्यापाऱ्यांनी प्रदर्शनी कपड्यांचे पुतळे लाऊन वाट अजून अरुंद करुन ठेवली आहे.

147

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या बोरीवली पश्चिम मधील भाजपा नगरसेवक प्रवीण शाह यांच्या प्रभागातील मुळात पदपथ (फुटपाथ) नाहीत. रस्त्यांलगत ज्या पर्जन्य जलवाहिन्या आहेत त्या बंदिस्त करुन त्यावर काँक्रीटीकरण करत पेव्हरब्लॉक बसवण्यात आले. याच बंदिस्त रस्त्यालगतच्या गटाराचा वापर फुटपाथ म्हणून केला जातो. परंतु पादचाऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या या फूटपाथवर कुठे पेव्हरब्लॉक काढून ठेवले, तर कुठे पेव्हर ब्लॉक उखडलेले, खचलेले आहेत.

टी मार्ग आणि ओम ज्वेलर्स येथे जोडणाऱ्या मार्गावरील पदपथाचे दोन रूपं

(हेही वाचाः दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?)

अनेक ठिकाणी या गटारांवर अतिक्रमण करत फेरीवाऱ्यांनी आपले धंदे पार रस्त्यांवर आणले आहेत. त्यामुळे ना फूटपाथवरुन पादचाऱ्यांना चालता येते ना रस्त्यांवरुन. पण या प्रमुख रस्त्यांवरील फूटपाथकडे या नगरसेवकांचे लक्ष नसून नेहमी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या स्थानिकांना आणि याठिकाणी खरेदीला येणाऱ्यांनी चालायचे कुठून, याचे उत्तर हे नगरसेवक देतील का?

. टी. मार्गाला जोडणाऱ्याला रस्त्यावरील नूतनीकरण केलेली पदपथ

 

(हेही वाचाः सभागृह नेत्यांच्याच प्रभागात फूटपाथ उखडलेले)

काम अजूनही अपूर्णच

बोरीवली पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील गोयल शॉपिंग सेंटर एल.टी. मार्ग जंक्शनपर्यंत आणि पुढे मंगल कुंज पर्यंत जुने पेव्हर ब्लॉक काढून टाकण्यात आले आहेत. यावर कच्चा काँक्रीटीकरणचा थर चढवला. परंतु अनेक महिने लोटले तरी पुढील कामे झालेली नाहीत. हे काम अर्धवटच आहे.

व्ही रोड मंगल कुंज समोरील पदपथ

तर स्टेशन मार्ग असलेल्या फूटपाथवर गोयल शॉपिंग सेंटर, सोनी शॉपिंग सेंटर, ओम ज्वेलर्स जवळ फूटपाथवरुन चालताच येत नाही. आधीच फूटपाथ अरुंद, त्यातच चालण्यास समतल नाही आणि तिथे कपडे व्यापाऱ्यांनी प्रदर्शनी कपड्यांचे पुतळे लाऊन वाट अजून अरुंद करुन ठेवली आहे.

शॉपिंग सेंटर परिसरपश्चिम गोयल शॉपिंग सेंटर बाहेरील परिसर

.टी. मार्ग सोनी शॉपिंग सेंटर

 

(हेही वाचाः ‘त्या’ फूटपाथची सुधारणा झाली)

फूटपाथवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

एल. टी. मार्ग व पंजाबी गल्ली जंक्शनला पूर्ण फूटपाथ अडवून ठेवले आहेत. पण पंजाबी गल्लीतील महापालिका कोविड लसीकरण केंद्राच्या पुढील भागात फूटपाथचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

.टी. मार्ग ओम ज्वेलर्स जवळ

एल. टी. मार्गाचा संपूर्ण फूटपाथ एकतर तुटलेल्या अवस्थेत असून, प्रत्येक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडलेले आणि फेरीवाल्यांनी अडवलेले आहेत. याठिकाणी नंद धाम इमारतीसमोर फेरीवाल्यांनी सामान बांधून ठेवत जागा कायमस्वरुपी अडवून ठेवली आहे, तर गणेश दर्शन समोर लाद्या उखडलेल्या आहेत.

. टी. मार्ग नंद धाम इमारती समोर

सागर हॉटेल शेजारी महाराष्ट्र नगर बस स्टॉपजवळही फेरीवाल्यांनी जागा कायमस्वरुपी सामानाने जागा अडवून ठेवली आहे, तनिष्कसमोर चालताही येत नाही.

समोर

पुढे स्टेशनच्या दिशेला ओम ज्वेलर्स ते वर्धमान स्थानिकवासी जैन संघापर्यंतच्या भागात पर्जन्य जलवाहिनीवरच दुकाने थाटलेली असून, या दुकानांचा पसारा रस्त्यापर्यंत वाढलेला आहे.

ज्वेलर्स ते वर्धमान स्थानक वासी जैन संघापर्यंत अडवली पदपथ 1

(हेही वाचाः प्रिन्सेस स्ट्रीट, दवा बाजार, लोहार चाळीत चाला पण स्त्यावरुन)

अनेक कामे अर्धवट स्थितीत

ही संपूर्ण पर्जन्य जलवाहिनी तुटलेल्या अवस्थेत असून ती साफही करता येत नाही. त्यामुळे पाण्याच्या निचऱ्याअभावी याठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. पुढे राधाकृष्ण हॉटेलसमोरील सुशीला मयेकर शॉपिंग सेंटर समोर, खोत चाळीतील टेस्टी दुकानासमोर तसेच खोत आर्केडपासून स्टेशनपर्यंतचे काम अर्धवट सोडून देण्यात आलेले आहे. हे काम पुढे मंगलकुंज, जांभळी गल्लीपर्यंत अर्धवट स्थितीत आहे.

हॉटेल समोरील पदपथ गल्ली

फूटपाथची अवस्था बकाल

विशेष म्हणजे मंगलकुंज इमारतीसमोरील फूटपाथवर रेलिंग लावण्यात आले आहेत. परंतु या रेलिंगच्या आतील परिसरात फेरीवाल्यांच्या मालवस्तू आणि रस्त्यावर विक्रीच्या वस्तू असतात, त्यामुळे फूटपाथची जागा अडवून ठेवल्यामुळे कुणाही नागरिकांना याचा वापर करता येत नाही.

चाळ टेस्टी दुकान समोर

उलट रस्त्यावर विक्री सामान लावत असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहतुकीला येथील खरेदीदारांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच जांभळी गल्लीतील संभव बिल्डींग परिसर आणि पेठे वाडी येथील फूटपाथचीही अवस्था बकाल आहे. ही गल्ली नवरात्रोत्सवासह इतर कपड्यांच्या खरेदीसाठी ओळखली जाते आणि सर्व वर्गातील लोक याठिकाणी खरेदीला येत असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.