- सुजित महामुलकर
स्तनदा माता (lactating mother) असणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि महिला पोलीस, शासकिय कर्मचारी यांच्यासाठी विधिमंडळ परिसरात सुरु करण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्षा’चा वापर एका महिला आमदाराने अधिवेशन काळात केला मात्र महिला कर्मचारी-पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कक्षाकडे अधिवेशन संपेपर्यंत एकही महिला फिरकली नाही. (Hirakani Cell)
मंत्री कार्यालयाचे ‘हिरकणी कक्षा’त रुपांतर
महिलांच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून शिंदे सरकारने हिरकणी कक्षाची स्थापना केली. महिला आमदारांसाठी नागपूरच्या विधिमंडळ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कक्ष सजवण्यात आला. साधारण १५० चौ फूट आकाराची एक खोली, जी २०२१ पर्यंत एका मंत्र्यासाठी कार्यालय म्हणून वापरात होती ती हिरकणी कक्षात रूपांतरित करण्यात आली. विविध रंगाचे फुगे, भित्तीपत्रकांनी सजवलेल्या या कक्षात एक खाट, एक पाळणा, खेळणी, बाथरूम तसेच मदत आणि सुरक्षेसाठी २ महिला सुरक्षारक्षक, २ वैद्यकीय कर्मचारी आणि एक पर्यवेक्षक या कक्षात १२ तास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. (Hirakani Cell)
(हेही वाचा – IPL 2024 Auction : समीर रिझवीच्या डोळ्यात पाणी तराळलं जेव्हा त्याची किंमत ८ कोटी रुपयांच्या वर गेली)
आमदार अहिरेंकडून कक्षाचा वापर
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर ७ पासून सुरु झाले. आज बुधवारी या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आमदरांसाठीच्या हिरकणी कक्षात ४-५ दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी वापर केला. त्या आपल्या १४-१५ महिन्याच्या बालकाला घेऊन कक्षात बसत असल्याचे कक्ष कर्मचाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कक्षाचे उद्घाटन अहिरे यांच्या हस्ते डिसेंबर २०२२ मध्ये झाले आणि त्यांनी तेव्हाही कक्षाचा वापर केला. (Hirakani Cell)
महिला कर्मचारी कक्षाकडे फिरकली नाही
महिला कर्मचाऱ्यांसाठी असलेला कक्ष विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असून गेल्या १५ दिवसात (अधिवेशन काळात) एकही स्तनदा माता फिरकली नाही. याबाबत वैद्यकीय आणि हिरकणी कक्षाचे प्रमुख डॉ गिरीश वानखेडे यांना विचारले असता त्यांनी ‘हिंदुस्तान पोस्ट’ला सांगितले की, “शक्यतो, स्तनदा माता असलेल्या पोलीस किंवा शासकीय कर्मचारी यांना अधिवेशन काळात विधिमंडळात ड्यूटी लावली जात नाही. त्यामुळे पोलीस व कर्मचाऱ्यांनी या कक्षाकडे येण्याची शक्यता कमी आहे.” (Hirakani Cell)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community