
लाडक्या बहिणींचा (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारीचा हप्ता (installment ) कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून (22 फेब्रु.) द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा-राज्याचे DCM Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा बुलढाण्यातून ताब्यात
डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे, असा अंदाज आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा-Naxalite : पोलीस चकमकीत चार जहाल महिला नक्षलवादी ठार
आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या (State Govt) 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे.वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community