मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamntri ladki bahin Yojana) महायुती सरकारसाठी महत्त्वाची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारनं जुलै 2024 पासून ही योजना लागू करत असल्याची घोषणा केली. या योजनेद्वारे ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम देण्यात आली आहे. महायुती सरकारच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी गेमचेंजर ठरली होती. मात्र ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निर्दशनास आलं होतं. त्यानंतर आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली.
या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही
आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार (Ladki Bahin Yojana GR) अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 7, 2025
अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या (Namo Shakti Yojana) लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.
(हेही वाचा – Uddhav Thackeray यांना मोठा धक्का? ६ खासदार शिवसेनेच्या वाटेवर!)
2100 रुपये कधी मिळणार?
दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर (Budget session 2025) लाडक्या बहिणींना या योजनेंतर्गत 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच जमा होऊ शकतो.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community