माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा, पात्रता काय आणि इतर आवश्यक तपशील पुढीलप्रमाणे आहे…
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) हा महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. राज्यातल्या २१ ते ६५ वर्षे वयोगटातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी, त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबात असलेली त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आणखी मजबूत करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक सहाय्य आणि महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्याकरिता राबवण्यात येत आहे.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेता यावा यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, तुमची अर्जाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची आणि इतर आवश्यक गोष्टींची तपशीलवार माहिती सांगणार आहोत.
(हेही वाचा – शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर उपलब्ध करून द्या; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे निर्देश)
माझी लाडकी बहीण योजना: ऑनलाइन अर्ज कसा भरावा?
‘माझी लाडकी बहीण योजने’चा ऑनलाइन पद्धतीने अर्जाचा फॉर्म भरण्यासाठी पुढे सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा..
- सर्वांत आधी माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करून “खाते तयार करा” हा पर्याय निवडा.
- मग तुमच्या समोर एक नोंदणी फॉर्म येईल. त्या फॉर्ममध्ये तुमचं पूर्ण नाव (आधार कार्ड नुसार), मोबाईल नंबर, पासवर्ड, पासवर्ड कन्फर्मेशन, जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/परिषद, अधिकृत व्यक्ती इ. माहिती भरा आणि अटी व शर्ती स्वीकारा.
- तुमचा फॉर्म सबमिट करण्यासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि “साइन-अप” बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक OTP (वन-टाइम पासवर्ड) मिळेल.
- तुमचं खातं सत्यापित करण्यासाठी OTP आणि कॅप्चा कोड पुन्हा प्रविष्ट करा.
- तुमच्या खात्यात लॉगिनची पुष्टी करण्यासाठी OTP व्हॅरीफाय केल्याचा मॅसेज येईल.
(हेही वाचा – Maharashtra Legislature परिसरात नवीन नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा)
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रतेची आवश्यकता आहे???
‘माझी लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेण्यासाठी खालील गोष्टींसाठी पात्र असणं आवश्यक आहे.
- लिंग: अर्जदार स्त्रीच असणं आवश्यक आहे.
- निवासस्थान: अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे.
- वय: अर्जदाराचं वय २१ ते ६५ वयोगटाच्या दरम्यान असावं.
- बँक खातं: अर्जदाराचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं आवश्यक आहे.
- कौटुंबिक उत्पन्न: अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹२,५०,००० पेक्षा जास्त नसावं. यामध्ये आउटसोर्स कर्मचारी, स्वयंसेवी कर्मचारी आणि ₹२,५०,००० पर्यंत उत्पन्न असलेले कंत्राटी कर्मचारी यांचा समावेश आहे.
- वैवाहिक स्थिती: अर्जदारांनी खालीलपैकी एका श्रेणीमध्ये येणं आवश्यक आहे…
★ विवाहित स्त्री
★ विधवा स्त्री
★ घटस्फोटित स्त्री
★ परितक्त्या आणि निराधार स्त्री
★ कुटुंबातली एक अविवाहित स्त्री
(हेही वाचा – Pune Bomb Threat: पुण्यातील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल)
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा?
‘माझी लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेण्यासाठी अर्ज करताना पुढील चरणांचे अनुसरण करा:
- सर्वात आधी लॉग इन (Log in) करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा वापरून पोर्टलवर प्रवेश करा.
- त्यानंतर अर्ज निवडण्यासाठी “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना” या अर्जावर क्लिक करा. मग तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
- आधार कार्ड व्हेरीफाय करण्यासाठी “आधार व्हेरीफाय करा” वर क्लिक करा आणि तुमचं नाव, बँकेचे तपशील आणि कायमचा पत्ता प्रविष्ट करून नोंदणी फॉर्म पूर्ण भरा.
- त्यानंतर पुढे आवश्यक असलेले दस्तऐवज अपलोड करा. जसं की, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्रांसह आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा. एसएमएसद्वारे तुमचा अर्ज आयडी प्राप्त करण्यासाठी “सबमिट” वर क्लिक करा.
माझी लाडकी बहीण योजनेची तुमच्या अर्जाची ऑनलाइन स्थिती तपासा
- तुमच्या अर्जाची ऑनलाइन स्थिती तपासण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा वापरून पोर्टलवर प्रवेश करा.
- त्यानंतर तुमच्या मागील अर्जांची स्थिती पाहण्यासाठी “मागील अनुप्रयोग” वर क्लिक करा.
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे…
- लाभार्थी महिलेचा फोटो
- आधार कार्ड (Aadhar card)
- निवास प्रमाणपत्र: (उपलब्ध नसल्यास, खालीलपैकी कोणतेही एक सबमिट करा:)
★१५ वर्षांपूर्वी दिलेलं रेशन कार्ड (Ration card)
★१५ वर्षांपूर्वी दिलेलं मतदार ओळखपत्र
★जन्म प्रमाणपत्र
★शाळा सोडल्याचा दाखला
●परदेशी जन्मलेल्या महिलांसाठी: खालीलपैकी एक सबमिट करा:
★पतीचं रेशनकार्ड १५ वर्षापूर्वी जारी केलेलं असावं
★ १५ वर्षापूर्वी दिलेलं मतदार ओळखपत्र
★ जन्म प्रमाणपत्र
★शाळा सोडल्याचा दाखला
★अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला: जर महिलेकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड (Ration card) असेल तर त्याची गरज नाही. तरी महिलेकडे पांढरे रेशन कार्ड असल्यास किंवा रेशन कार्ड (Ration card) नसल्यास ते आवश्यक आहे.
- विवाह प्रमाणपत्र: जर तुमचं नाव रेशन कार्डमध्ये सूचीबद्ध नसेल आणि तुम्ही नवीन विवाहित असाल, तर तुम्ही उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुमच्या पतीचं रेशन कार्ड वापरू शकता.
- बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असावं.
- हमीपत्र: (लागू असल्यास)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community