Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार; २ कोटी ६३ लाख अर्जांची पडताळणी होणार

77
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार; २ कोटी ६३ लाख अर्जांची पडताळणी होणार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार; २ कोटी ६३ लाख अर्जांची पडताळणी होणार

लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana ) एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला आयकर विभागाने असहकार दर्शवला आहे. त्यात अजूनपर्यंत आयकर विभागाने (Income Tax Department) सहकार्य न केल्याने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी आता रखडली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या अर्जाची पडताळणी होईल. त्यातील नियमांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येईल.

( हेही वाचा : Delhi Government पहिल्यांदाच हिंदू नववर्ष साजरे करत देणार ‘फलाहार पार्टी’

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) २ कोटी ६३ लाख महिलांची माहिती दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाकडे मागण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यांपासून मागितलेली ही माहिती आयकर विभागाकडून (Income Tax Department) देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी पूर्ण होऊ शकलेली नाही. परंतु लवकरच या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे. या योजनेत ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांची अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi worker) जाऊन पडताळणी केली आहे. यासाठी परिवहन विभागाची मदत घेण्यात आली होती. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्यात आली आहे.

दरम्यान आयकर विभागाने (Income Tax Department) लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागवली होती. मात्र, ही माहिती न मिळाल्याने पडताळणी आता ठप्प झाली आहे. महिला व बालविकास विभागाने (Women and Child Development Department) २ कोटी ६३ लाख महिलांची माहिती मागवली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, अशी प्राथमिक अट ठेवण्यात आली होती. त्यामुळेच आयकर विभागाच्या (Income Tax Department) मदतीने पडताळणी केली जाणार असल्याचे सांगितले होते.

लाडकी बहीण योजनेत महिलांनी विधानसभा निवडणुकाआधी अर्ज केले होते. यातील काही महिलांनी निकष डावलून लाभ घेतला आहे. त्यामुळेच महिला व बालविकास विभागाने (Women and Child Development Department) दोन महिन्यांपूर्वी पत्र लिहून आयकर विभागाकडे महिलांच्या उत्पन्नाबाबत माहिती मागितली होती. परंतु माहिती न मिळाल्यानंतर फेरतपासणीसाठी अडथळे येत आहेत. (Ladki Bahin Yojana )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.